किरकटवाडी: कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या खानापूर (ता. हवेली) येथील गणेश तिकोने या 40 वर्षीय व्यक्तीचा बेड व उपचारांअभावी घरी तडफडून मृत्यू झाला. सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत मृतदेह घरासमोरच पडून होता. प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने खानापूर गावचे सरपंच निलेश जवळकर, पोलिस पाटील गणेश सपकाळ, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आदित्य धारूरकर व गावातील तरुण ओम तिकोने यांनी पीपीई किट परिधान करून मृत गणेश तिकोने याच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. (व्हिडीओ : निलेश बोरुडे)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.